‘मी मुसलमान आहे, माझ्यावर प्रेम कर’, असे सांगत हिंदु मुलीला त्रास देणार्या मुसलमान तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद !
हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील घटना
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – मी मुसलमान आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्यावर प्रेम करतेस का ?, असे लिहिलेले पत्र अल्पवयीन मुलीवर फेकून तिला त्रास देणार्या १९ वर्षीय अब्दुल रजाक या युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. होसुर बस स्थानकाजवळ अल्पवयीन मुलगी तिच्या बहिणीसह उभी असतांना ही घटना घडली. मुलीने तिच्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. अब्दुल कलघटगी तालुक्यातील हिरेहोन्ळ्ळी गावात रहातो.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे धर्मांध मुसलमानांना मोकळे रान मिळाले असल्याने ते सातत्याने हिंदूविरोधी कृत्य करत आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवल्यावर काय होते, हे हिंदूंना कधी कळणार ? |