कासरगोड (केरळ) येथे घरात घुसून चोरी करणार्या मुर्शिद याला अटक
कासरगोड (केरळ) – येथील पच्चंबळातील एका घरात घुसून २९ सहस्र ७०० रुपये चोरल्याच्या प्रकरणी कुंबळे पोलिसांनी मुर्शिद (वय १९ वर्षे) याला अटक केली आहे.
मुर्शिद २ मजली घराच्या गच्चीवरील दार तोडून आत शिरला आणि कपाटात ठेवलेले पैसे घेऊन पसार झाला होता. घरातील लोक तळमजल्यावर झोपले होते. दुसर्या दिवशी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेविषयी कुंबळे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली. चौकशीत मुर्शिदने गुन्ह्याचा स्वीकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिकासमाजात अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य असतात, याचा आणखी एक पुरावा ! |