Delhi Pakistani Slogans : देहलीत तरुणाने घराच्या भिंतीवर लिहिली ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा !
तरुण मानसिक आजारी असल्याची शक्यता !
नवी देहली – देहलीतील रोहिणी विभागातील अवंतिका परिसरात एका तरुणाने घराच्या भिंतीवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘पाकिस्तान लाँग लीव’ (पाकिस्तान अमर आहे !) अशा घोषणा लिहिल्या आहेत. याला स्थानिकांनी विरोध केल्यावर तरुणाने त्यांच्याशी वाद घातला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. हा तरुण मानसिक आजारी असल्याचे दिसून येत आहे. त्याची चौकशी चालू आहे. देहली पोलीस, गुप्तचर विभाग, पोलिसांची विशेष शाखा या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
A young man wrote ‘Pakistan Zindabad’ and ‘Long Live Pakistan’ on a wall of his house in Delhi.
The young man is suspected to be mentally ill.
Mentally ill individuals do nothing else apart from either attacking Hindu temples or supporting Pakistan! pic.twitter.com/mOeW0II9Ag
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 5, 2024
संपादकीय भूमिकामानसिक आजारी असणारे दुसरे काही न करता एकतर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करतात किंवा पाकिस्तानचे समर्थन करतात ! |