पुणे येथे जोडप्यास धमकावल्याच्या प्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित !
पुणे – हॉटेलमध्ये रहात असलेल्या दांपत्याला संदीप शिंदे या पोलीस कर्मचार्याने दबाव टाकून धमकावल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी एका तरुणाने कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रार केल्यानंतर पोलीस कर्मचार्याचे निलंबन करण्यात आले. ही घटना १९ जुलै या दिवशी घडली आहे.
कोरेगाव पार्क गल्ली क्रमांक ५ मध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये एक जोडपे रहाण्यासाठी आले होते. हॉटेलमध्ये खोली घेण्यासाठी त्यांनी काही कागदपत्रे दिली होती. ही कागदपत्रे संदीप शिंदे या पोलीस कर्मचार्याने हॉटेल व्यवस्थापकाकडून घेतली. त्यानंतर त्याने संबंधित व्यक्तीस दूरभाष आणि संदेश करून दबाव टाकून धमकावण्यास प्रारंभ केला. (पोलीसच गुन्हे करू लागले, तर नागरिक अधिक असुरक्षित झाले, असे म्हणावे लागेल. पोलीस खात्यात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा भरणा झाल्यामुळे पोलिसांचा धाक संपला आहे ! – संपादक)