धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार ! – आमदार नितेश राणे
उल्हासनगर येथील हिंदु तरुणीचे धर्मांतर झाल्याचे प्रकरण
मुंबई – महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. या प्रकरणी ते म्हणाले, ‘‘आम्ही हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लागू केलेला धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणीही त्यांच्याकडे करणार आहोत.’’
उल्हासनगर येथील इयत्ता बारावीत शिकणार्या एका तरुणीचे धर्मांतर करण्यात आले. ती शेजारी रहाणार्या मुसलमान कुटुंबात त्यांच्या मुलांची शिकवणी घेण्यास जायची. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी केली जात आहे.