Attacks on police in Britain : ब्रिटनच्या १५ शहरांत पोलिसांवर आक्रमणे, पोलीस ठाण्यांत जाळपोळ !
|
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या साऊथपोर्ट येथे २९ जुलैला एका १७ वर्षीय मुलाने ३ मुलींची चाकूने भोसकून हत्या केल्यावरून ब्रिटनमध्ये हिंसाचार झाला होता. आता याचे लोण १५ शहरांमध्ये पसरले आहे. संबंधित आरोपी मुसलमान असल्याचे सांगितले जात असून अनेक कट्टर राष्ट्रवादी गटांनी तेथे हिंसा चालू केली आहे. आरंभी साऊथपोर्ट येथील मशिदीमध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुदरलँडमध्येही नागरिकांनी उग्र प्रदर्शन केले. आंदोलकांनी पोलिसांना आणि पोलीस ठाण्यांना लक्ष्य केल्यानंतर लाठीमार करण्यात आला. या वेळी काही पोलीसही गंभीर घायाळ झाले. अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
१. ३ ऑगस्ट या दिवशी हिंसक जमावाने पोलिसांवर दगड आणि विटा यांचा मारा केला. अनेक शहरांमध्ये पोलीस ठाण्यांमध्ये आग लावण्याच्या घटना घडल्या.
२. देशभरातील १५ शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनता रस्त्यावर उतरली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले.
३. अनेक आंदोलकांच्या हातात ब्रिटनचा राष्ट्रध्वज होता. या वेळी ‘ब्रिटन आम्हाला परत हवा आहे’, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या.
४. साऊथपोर्ट येथील अटकेत असलेल्या आरोपीचे नाव अॅक्सेल रुदाकुबाना असल्याचे सांगितले जात असून त्याचे वडील ख्रिस्ती आहेत, तसेच ते मूळचे रवांडा देशातील आहेत.
संपादकीय भूमिकामुळात हिंसाचार हत्या करणारा मुसलमान असल्याच्या माहितीवरून पसरला. जिहादी आतंकवाद, तसेच मुसलमान शरणार्थी यांच्याकडून केल्या जाणार्या हिंसाचारावर ठोस कारवाई न केल्यानेच सामान्य जनतेत त्यांच्याविषयी रोष आहे. त्यामुळे अशा घटनांनंतर हिंसाचार पसरल्यास त्याला सरकार आणि तिची धोरणे यांनाही उत्तरदायी ठरवायला नको का ? |