रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. माणिक मु. तोसनीकाळ (सचिव, माहेश्‍वरी सेवा समिती), विजयपूर, बागलकोट, कर्नाटक.

अ. ‘संपूर्ण आश्रम सकारात्‍मक ऊर्जेने भारलेला आहे.

आ. एका तीर्थक्षेत्री गेल्‍यावर जशी अनुभूती येते, तशी अनुभूती या आश्रमात आल्‍यावर आली.

इ. येथे आल्‍यामुळे मी स्‍वतःला भाग्‍यवंत समजतो.’

२. श्री. रमेश बाहेती (अध्‍यक्ष, माहेश्‍वरी सेवा समिती), विजयपूर, बागलकोट, कर्नाटक.

अ. ‘आश्रम पाहून मन प्रफुल्लित झाले.

आ. आजपर्यंत असा पूर्णपणे सुसज्‍ज आणि शिस्‍तबद्ध, तसेच आध्‍यात्मिक आश्रम मी पाहिला नाही.’

३. श्री. चंद्रकांत पाण्‍डेय (हिंदु महासभा), मथुरा, उत्तरप्रदेश.

अ. ‘जर आपण आपल्‍या जीवनात आहार-विहार सात्त्विक केले, तर जीवन सर्वगुणसंपन्‍न होईल.

आ. येथे सकारात्‍मक विचार आणि ऊर्जा प्राप्‍त झाली.

इ. जीवनाचे सार या आश्रमात दर्शवलेले आहे. आपण ते आपल्‍या आचरणात आणले पाहिजे.’

४. श्री. अनुज द्विवेदी (संघटन मंत्री, हिंदु जनसेवा समिती), लखनऊ, उत्तरप्रदेश.

अ. ‘आमच्‍या मनाला हा आश्रम शांतीचे प्रतीक असल्‍याची जाणीव झाली.

आ. आम्‍ही पुष्‍कळ संतुष्‍ट झालो. आश्रम पुष्‍कळ छान आहे.

इ. येथील शांत वातावरण मनाला भावले.

ई. येथील सर्व सेवकांचा पुष्‍कळ आभारी आहे. त्‍यांनी आम्‍हाला अतिशय चांगल्‍या पद्धतीने सर्व गोष्‍टी समजावून सांगितल्‍या.’

५. श्री. प्रज्‍वल गुप्‍ता (अध्‍यक्ष, हिंदु जनसेवा समिती), लखनऊ, उत्तरप्रदेश.

अ. ‘जडवादापासून निराळा असलेला हा आश्रम सनातन धर्मासाठी आहे.

आ. येथील वातावरण एकदम वेगळे आहे.

इ. येथे आल्‍यावर शरिरात एका नवीन ऊर्जेची निर्मिती झाली.

ई. आश्रमातील लोकांचा भाव अतिशय चांगला आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २६.६.२०२४)

 

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक