हत्येच्या गुन्ह्यातील पोलीस बडतर्फ !
पुणे – वडिलोपार्जित भूमीच्या वादातून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. फडतरे हे पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. वडिलोपार्जित भूमीवरून त्यांचे भावकीसमवेत वाद आहेत. या वादातून विक्रम यांचा भाऊ विशाल यांनी त्यांचा नातेवाईक विनोद फडतरे याची हत्या केली होती. या गुन्ह्यात विशाल फडतरे आणि त्याचे वडील गणपत फडतरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. (पोलिसांचा गुन्ह्यात सहभाग असणे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)