ब्रह्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना केरळ येथील सौ. सुमा पुथलत यांना आलेल्या अनुभूती !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहातांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाचे स्मरण होणे
‘गुरुदेवांना बघताक्षणी माझी भावजागृती होऊन अश्रू अनावर झाले. त्या वेळी मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाची आठवण झाली. प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी होतांना मला त्यांचा चेहर्यावरील भाव आठवला. मला प.पू. गुरुदेवांच्या चेहर्यावरही तसाच भाव जाणवला.
२. मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे पहातांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचेच दर्शन झाले.
३. केरळ येथील कोची सेवाकेंद्रातील वातावरण प्रसन्न जाणवणे
अनुमाने सायंकाळी ६ वाजता वातावरणात पालट जाणवत होता. आभाळ पुष्कळ सुंदर दिसत होते आणि सेवाकेंद्रातील वातावरण प्रसन्न वाटत होते.’
– सौ. सुमा पुथलत, कोची सेवाकेंद्र, केरळ (१५.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |