कर्जत (जिल्हा रायगड) येथे ४ धर्मांधांकडून हिंदु तरुणाला अमानुष मारहाण !
|
कर्जत (जिल्हा रायगड) – सी.एन्.जी. गॅस भरण्यासाठी आकाश पाटील नावाचा हिंदु तरुण नेरळ येथील सी.एन्.जी. पंपावर गेला होता. त्या वेळी त्याची बहीण रिक्शातून उतरून काही अंतरावर उभी होती. त्याचवेळी गॅस भरण्यासाठी आलेल्या इतर चार तरुणांनी तिची छेड काढली. याविषयी आकाशने त्यांना खडसावले. तेव्हा त्या चौघांनी त्याला आमानुष मारहाण केली.
या प्रकरणी त्याने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली असून पोलिसांनीही तिघांना कह्यात घेतले. मुझमिल मलिक बुबेरे, फरान नासिर नजे, रियाझ महंमद बिलाल शेख अशी त्यांची नावे असून त्यातील एकजण अल्पवयीन आहे. एका आक्रमणकार्याने हातातील कड्याने आकाशच्या डोक्यात फटका मारून त्याला गंभीर घायाळ केले आणि तो तेथून पळून गेला. पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Karjat (District Raigad): 4 Mu$|!m$ beat up a Hindu youth, as he opposes the bigots eve teasing his sister.
▫️3 fanatics arrested.
▫️Eve teasers under police custody for 5 days.
👉 O’ Hindus, how long will we suffer at the hands of aggressive fanatics.
👉 Learning an art of… pic.twitter.com/8DXLrW20N8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 4, 2024
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांध मुसलमानांकडून मार खात रहाणार ? आपल्या लेकीबाळींसह स्वतःचेही रक्षण करण्यसाठी आत्मबळ वाढवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! |