Iran Israel Tension : इराणची पुढील ७२ घंट्यांत इस्रायलवर आक्रमण करण्याची धमकी
अमेरिकेने इस्रायलला पुरवले संरक्षण !
वॉशिंग्टन (अमेरिका) / तेल अविव (इस्रायल) – इराणने (Iran) हमासचा प्रमुख इस्माईल हानिया (Ismail Haniyeh) याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी पुढील ७२ घंट्यांमध्ये इस्रायलवर (Israel) आक्रमण करण्याची धमकी दिली आहे. हे पहाता अमेरिकेने जल, भूमी आणि आकाश येथील इस्रायलची सुरक्षा वाढवली आहे.
अमेरिकेचे (America) संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन (Lloyd Austin) यांनी सांगितले की, विमानवाहू युद्धनौका ‘यू.एस.्एस्. अब्राहम लिंकन’ला प्रशांत महासागरातून आता ओमानच्या खाडीत तैनातीसाठी मार्गस्थ केले आहे. इस्रायलच्या पश्चिमेस भूमध्य सागरातही अमेरिकेने तिची विनाशक युद्धानौका आणि ८० लढाऊ विमाने तैनात केली आहेत. मध्य आशियातील १० देशांत सध्याची ४५ सहस्र अमेरिकी सैनिकांची संख्या दुप्पट करून ५० सहस्र नवे सैनिक तैनात केले आहेत.