Wayanad Landslide : वायनाड भूस्खलनानंतर विस्थापित झालेल्यांच्या घरांमध्ये होत आहेत चोर्‍या !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – वायनाडच्या भूस्खलनात मृत झालेल्यांची संख्या ३६५ वर पोचली आहे. यामध्ये ३० मुलांचाही समावेश आहे. २०६ लोक अद्याप बेपत्ता आहेत. येथे ४ ऑगस्ट या ६ व्या दिवशीही येथे शोधमोहीम चालू आहे. येथे भूस्खलनामुळे विस्थापित झालेल्या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या घरांमध्ये चोर्‍या होत आहे. काही लोक रात्रीच्या वेळी येऊन घरातील मौल्यवान वस्तू चोरत आहेत. या संदर्भात तक्रार केल्यानंतर आता पोलीस चोरांना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री विजयन् यांनी सांगितले की, केरळ सरकार भूस्खलनात घरे आणि भूमी गमावलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी सुरक्षित क्षेत्रात एक नगर निर्माण करेल.  भूस्खलनग्रस्त भागातील उर्वरित लोकांना येथे स्थायिक केले जाईल. हा पुनर्वसन प्रकल्प लवकरच पूर्ण होईल.

संपादकीय भूमिका

केरळमधील माकप सरकारला हे लज्जास्पद !