भिवंडीतील अनधिकृत ‘टेलिफोन एक्सचेंज’वर आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !
जाफर बाबूउस्मान पटेल अटकेत
ठाणे – भिवंडीत नवीन गौरीपाडा आणि रोशनबाग या ठिकाणी धाडी घालून अनधिकृतपणे चालणार्या ‘टेलिफोन एक्सचेंज’वर राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) कारवाई केली आहे. या प्रकरणी जाफर बाबूउस्मान पटेल याला अटक केली आहे. दीड वर्षापासून हे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालू होते. त्यामुळे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाची ३ कोटी रुपयांची हानी झाली आहे. येथून आखाती देशात दूरध्वनी करण्यात आले आहेत. या कारवाईत विविध आस्थापनांची २४६ सिम कार्ड, ८ ‘वायफाय राऊटर’, १९१ अँटीना, इनव्हर्टर यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :सर्वत्र देशविरोधी कारवायांत बहुसंख्येने सहभागी असलेल्या जिहादी मुसलमानांवर तत्परतेने कठोर कारवाई केल्याचा संदेश समाजात पोचला, तरच याला आळा बसेल ! |