‘गुरूंनी साधकाला सांगितलेली चूक’, ही त्यांच्या प्रसादाप्रमाणे कल्याणदायी असते’, याची साधकाला आलेली प्रचीती !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘२४ ते ३०.६.२०२४ या कालावधीत गोवा येथील रामनाथ देवस्थान परिसरात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातील वक्त्यांचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मला गुरुकृपेमुळे मिळाली होती.

श्री. राम होनप

या कालावधीत प्रतिदिन मी केलेल्या सूक्ष्म परीक्षणाची संगणकीय धारिका परात्पर गुरु डॉ. आठवले पडताळत असत. महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या सूक्ष्म परीक्षणात परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी एक चूक माझ्या लक्षात आणून दिली. त्यानंतर माझ्या बहिणीने (सुश्री (कु.) दीपाली यांनी) मला विचारले, ‘‘तू महोत्सवातील ७ दिवस सूक्ष्म परीक्षण केले. या सेवेसाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी तुला प्रसाद दिला का ?’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘हो. त्यांनी सूक्ष्म परीक्षणातील एक त्रुटी माझ्या लक्षात आणून दिली. हा माझ्यासाठी प्रसादच आहे.’’

या प्रसंगानंतर माझ्या मनात पुढील विचार आले, ‘ज्याप्रमाणे प्रसाद ग्रहण केल्याने साधकाला चैतन्य मिळते आणि त्याच्या साधनेला चालना मिळते, त्याप्रमाणे गुरूंनी माझ्या सेवेतील त्रुटी सांगितल्याने ‘मी साधनेत कुठे न्यून पडतो ?’, हे मला समजले. त्यातून माझे आध्यात्मिकदृष्ट्या कल्याणच झाले. त्यामुळे त्यांनी सांगितलेली त्रुटी ही प्रसादस्वरूपच आहे.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२४)

  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक