सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यशासन ‘संविधान मंदिरे’ उभारणार !
मुंबई – महाराष्ट्रातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ शासकीय तांत्रिक विद्यालये यांमध्ये राज्यशासन संविधान मंदिरे उभारणार आहे. यामध्ये संविधान उपक्रम राबवला जाणार असून १५ ऑगस्ट या दिवशी या उपक्रमाचे एकाच वेळी ऑनलाईन उद्घाटन केले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना राज्यघटनेचे महत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिकवण दिली जाणार आहे. यासह विविध स्पर्धांचे आयोजन येथे केले जाईल, अशी माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये ‘४०० हून अधिक जागा प्राप्त झाल्यास भाजप राज्यघटना पालटणार’ या विरोधकांनी केलेल्या प्रचाराचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये, यासाठी महायुतीकडून हा उपक्रम राबवला जात असल्याचे म्हटले जात आहे.