‘कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित संस्थे’च्या संस्कार शिबिराची आज सांगता !
कोल्हापूर, ३ ऑगस्ट (वार्ता.) – ‘कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित संस्था’ ही गेली १० वर्षे धार्मिक, सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते. यात अथर्वशीर्ष, रुद्र, उदकशांती, सूक्तपाठ, शिवमहिम्न स्तोत्र अशा स्तोत्रांचे पठण केले जाते. या शिबिरात सर्व धार्मिक विधी शिकवले जातात. या संस्थेच्या वतीने २७ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत विश्वपंढरी सभागृह येथे १० दिवसांचे संस्कार शिबिर पार पडत असून ४ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजता याची सांगता होणार आहे. त्यासाठी गुरुवर्य ष.ब्र. डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर, गुरुवर्य ष.ब्र. १०८ श्री महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांसह अन्य महाराज उपस्थित रहाणार आहेत. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिक-समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक जंगम, श्री. दयानंद जंगम, श्री. संतोष जंगम, श्री. प्रसाद स्वामी यांनी पत्रकार परिषदेत केले.