सरकारने तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !
हिंदु जनजागृती समितीची वणीच्या नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
वणी (यवतमाळ), ३ ऑगस्ट (वार्ता. ) – उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्यावी आणि सरकारने तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा, अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालय, वणी येथील नायब तहसीलदार ब्राह्मणवाडे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देतांना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मंगेश धोबे, योग वेदांत सेवा समितीचे पुंडलिक मते, श्रीराम आरती भक्त मंडळाचे संघर्ष झाडे, अर्जुन वैद्य, वेदांत पिदूरकर आणि सनातन संस्थेचे वामन मत्ते, लोभेश्वर टोंगे, तसेच समितीचे लहू खामणकर सहभागी झाले होते.