London Conversion of Hindu student to Islam : लंडन (ब्रिटन) येथील शाळेत ७ वर्षाच्या हिंदु विद्यार्थ्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणारे ३ मुसलमान मुले निलंबित !
लंडन (ब्रिटन) – येथील एका शाळेत ७ वर्षांच्या हिंदु मुलाचे त्याच्या समवेत शिकणार्या मुसलमान विद्यार्थ्यांनी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मुसलमान विद्यार्थ्यांनी या मुलाला सांगितले होते की, जर त्याने हलाल मांस खाल्ले, तर त्याचे शरीर सशक्त होईल. तसेच त्याचे नाव पालटून महंमद ठेवण्यास सांगितले आणि त्याचे मनगटही कापले. मुसलमान विद्यार्थ्यांनी धमकी दिली की, जर त्याने त्याचे नाव पालटून महंमद केले नाही, तर ते त्याच्याशी मैत्री करणार नाहीत. याप्रकरणी हिंदु मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने ३ मुसलमान विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.
मुलाच्या वडिलांनी सांगितले की, या प्रकरणाची तक्रार वडिलांनी वर्गशिक्षकाकडे केली असता त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर ३ मुसलमान विद्यार्थ्यांना शाळेतून निलंबित करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|