Madarsa cleric rapes Hindu woman : उपचारांसाठी गेलेल्या हिंदु महिलेवर बलात्कार करणार्या मौलवीला अटक
वडाळागाव (नाशिक) येथील घटना
वडाळागाव (जिल्हा नाशिक) – येथे आजार बरा करण्याच्या बहाण्याने मौलवी हुसन यासीम शेख याने १९ वर्षीय विवाहितेवर बलात्कार केला. पीडितेच्या सतत पोटात दुखत असल्याने तिचा पती आणि सासू तिला मौलवी हुसन यासीम शेख याच्याकडे उपचारासाठी घेऊन गेल्यावर ही घटना घडली. मुलीच्या तक्रारीवरून मौलवीला अटक करण्यात आली आहे.
शेख याने महिलेला भूतबाधा झाल्याची निश्चित केल्याचे सांगितले. त्याने तिला भूल येण्याचे औषध दिले, त्यामुळे पीडितेचे भान हरपले. ती बेशुद्ध असतांना तिच्यावर बलात्कार केला आणि माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
संपादकीय भूमिका
|