काँग्रेसच्या नेहरूंनी राज्यघटनेतील हिंदु धर्माशी संबंधित चित्रे हटवून तिला निधर्मी बनवले !

स्वातंत्र्यानंतर हिंदुद्वेष्ट्या नेहरूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्याची न्याय्य मागणी धुडकावून हिंदूंना आणि राज्यघटनेलाही ‘निधर्मी’ बनवण्याचा कसा प्रयत्न केला, ते या लेखातून पाहूया.

१. हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर सोडून दिले !

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला; पण तत्पूर्वी १४ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचे विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. भारताचे हे विभाजन धार्मिक आधारावर झाले. मुसलमान बहुसंख्य असणारा भूभाग पाकिस्तानला देण्यात आला. या मुसलमान बहुसंख्य असणार्‍या भूभागातून १० लाख हिंदूंना मुसलमानांकडून नेसत्या वस्त्रानिशी आणि त्यांच्या पूर्वापार असलेल्या घरादारातून हाकलवून लावण्यात आले. पूर्व बंगाल, उत्तरेकडील सिंध, पंजाब येथे जेव्हा हिंदूंच्या नृशंस कत्तली होत होत्या, स्त्रियांवर अमानुष बलात्कार होत होते, तेव्हा देहलीमध्ये हिंदुद्वेष्ट्या नेत्यांची सत्तेवर आरूढ होण्याची लगबग चालू होती. त्यांना दुसरीकडे हिंदूंच्या होत असलेल्या भीषण संहाराशी, हिंदु स्त्रियांच्या अब्रूचे जे धिंडवडे निघत होते, त्याच्याशी काही देणे-घेणे नव्हते. हिंदूंच्या रक्षणाची त्यांनी कोणतीही काळजी घेतली नाही. त्यांनी हिंदूंना अक्षरशः मुसलमानांच्या दयेवर सोडून दिले.

श्री. शंकर गो. पांडे

२. स्वातंत्र्यानंतर ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी न्याय्य होती !

मुसलमानांना धार्मिक आधारावर पाकिस्तान दिल्यानंतर उर्वरित भारतात हिंदूंची लोकसंख्या ८५ टक्के एवढी होती. त्यामुळे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात कोणतीच अडचण नव्हती. अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी तशी मागणीही केली होती. हिंदूंचीही तशीच इच्छा होती. विशेष म्हणजे भारतात राहिलेल्या मुसलमान नेत्यांची आणि जनतेची यासाठी मानसिक सिद्धताही झाली होती. मुसलमान समाजाने धार्मिक आणि लोकसंख्येच्या आधारावर वेगळ्या देशाची मागणी केल्यानंतर आणि ती मागणी मान्य झाल्यानंतर हिंदूंनाही हिंदु राष्ट्राची मागणी करण्याचा अधिकार होता. हिंदूंची मागणी न्याय होती; पण सत्तारूढ झालेल्या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना ‘भारत हिंदु राष्ट्र व्हावे’, हे मुळीच मान्य नव्हते.

३. हिंदुद्वेष्ट्या नेत्यांची ‘धर्मनिरपेक्ष’ मायावी संकल्पना

‘भारतही एक मुसलमान देश व्हावा’, हीच त्यांची आंतरिक इच्छा होती; कारण ते जन्माने हिंदु असले, तरी संस्कृती आणि भाषा यांनी मुसलमान आणि ख्रिस्ती होते. भारतात हिंदु बहुसंख्य असल्यामुळे त्यांना या देशाला मुसलमान बनवण्याची आंतरिक इच्छा बोलून दाखवता येत नव्हती; पण त्यांच्या सर्व कृती त्याच दिशेने हळूहळू चालू होत्या. त्यांनी आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यघटना या शस्त्राचा वापर चालू केला. यासाठी त्यांनी ‘सेक्युलर (निधर्मी)’ या शब्दाचा आधार घेऊन त्याचा गैरवापर करणे चालू केले. ‘सेक्युलर’ ही एक मायावी संकल्पना होती.

४. असहिष्णु पंथ सोडून व्यापक हिंदूंनाच धर्मनिरपेक्षतेचे डोस

मुळात प्रत्येक हिंदु हा जन्मतःच सहिष्णु असल्यामुळे तो जगातील सर्वच धर्मांचा सारखाच आदर करतो. त्यामुळे त्याला ‘धर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम)’ शिकण्याची काहीच आवश्यकता नव्हती. मुसलमान आणि ख्रिस्ती यांसारखे केवळ एकच धर्मग्रंथ आणि देव यांना मानणार्‍या अन् इतर सर्व धर्मियांचा जगण्याचाही मूलभूत नाकारणार्‍या अत्यंत असहिष्णु आणि संकुचित वृत्ती असणार्‍यांना धर्मनिरपेक्षतेची संकल्पना शिकवणे आवश्यक होते; पण या २ धर्मांध समाजांना वरील संकल्पना शिकवण्याऐवजी हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी उलट पूर्वीपासूनच जो समाज सहिष्णु आहे, त्याच हिंदु धर्मियांच्या मनावर धर्मनिरपेक्षतेचे संस्कार बिंबवणे चालू केले.

५. हिंदूंना प्रथम धर्मनिरपेक्ष आणि नंतर मुसलमान किंवा ख्रिस्ती बनवण्याचे षड्यंत्र

आपल्या हिंदूंपैकी किती जणांना ठाऊक आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या हिंदुद्वेष्ट्या सल्लागारांनी या देशावर असणारा हिंदु धर्माचा प्रभाव नष्ट करण्यासाठी अन् भारताला प्रथम ‘सेक्युलर’ आणि नंतर हळूहळू मुसलमान किंवा ख्रिस्ती बनवण्याचे एक भयंकर षड्यंत्र कशा प्रकारे रचले होते ? पंडित नेहरू यांच्यानंतर त्यांच्या वंशजांनीही त्याच षड्यंत्राचा पाठपुरावा केला, जो अद्यापपर्यंत चालू आहे. प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी नुकताच एका व्हिडिओमधून त्या षड्यंत्रावर प्रखर प्रकाश टाकला आहे.

६. राज्यघटनेवरील हिंदु संस्कृतीनुसार समृद्धीचे प्रतीक असलेला सोनेरी रंग आणि कमळांची नक्षी यांचे मुखपृष्ठ पालटले !

भारताच्या राज्यघटनेच्या प्रती जेव्हा छापून प्रकाशित करण्यात आल्या, तेव्हा त्याचे मुखपृष्ठ सोनेरी रंगाचे होते आणि पृष्ठाच्या कडेवर कमळाची फुले अंकित करण्यात आली होती. हिंदु धर्मात सोनेरी रंग हा समृद्धता आणि कमळ हे पावित्र्याचे निदर्शक आहे. भगवान श्रीविष्णूच्या नाभीतून अंकुरित झालेल्या कमलपुष्पात धनाची देवता श्रीलक्ष्मीचा निवास असतो; पण हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना मुखपृष्ठावरील हा हिंदूंचा प्रभाव मान्य नव्हता. पुढच्या आवृत्तीत त्यांनी राज्यघटनेच्या मुखपृष्ठावरील सोनेरी रंग आणि कमळाची फुले हटवली.

७. हिंदु संस्कृतीची प्राचीनता दाखवणार्‍या सिंधु संस्कृतीचे चित्र हटवले !

राज्यघटनेचे एकूण २२ भाग आहेत. प्रत्येक भागातील लिखाणाचा आरंभ होण्यापूर्वी पहिल्या पानावर एक चित्र अंकित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या सर्व चित्रांमधून हिंदु धर्म, सभ्यता आणि संस्कृती यांचे उत्कटतेने प्रदर्शन होत होते. पहिल्या भागाच्या मुखपृष्ठावर सिंधु घाटीची सभ्यता दाखवण्यात आली होती. जगातील सर्र्वांत प्राचीन आणि सर्वाेच्च असणार्‍या या सभ्यतेचा हिंदूंना अभिमान आहे. या चित्राच्या माध्यमातून हिंदु सभ्यता दृगोच्चर होत होती; म्हणून हे चित्र हटवण्यात आले.

८. गुरुकुल पुष्पक विमानासह येणारे प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असतांनाचे चित्र काढले !

राज्यघटनेचा दुसरा भाग भारताच्या नागरिकत्वाविषयी आहे. या भागात भारतातील प्राचीन शिक्षणपद्धत दर्शवण्यासाठी एका गुरुकुलाचे चित्र होते. भारतातील या गुरुकुलात ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, कला अशा सर्वच विषयांचे ज्ञान शिकवले जात असे. या गुरुकुलात शिकूनच विविध क्षेत्रांतील तज्ञ, विद्वान सिद्ध झाले होते; पण भारतातील हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना भारतातील गुरुकुल शिक्षणपद्धत नष्ट करून भारतियांना मानसिकदृष्ट्या गुलाम करणारी मेकॉलेची शिक्षणपद्धत येथे रुजवायची होती; म्हणून त्यांनी राज्यघटनेतून हेही चित्र हटवले. राज्यघटनेतील तिसरा भाग भारतियांच्या मूलभूत अधिकारांसंबंधीचा आहे. यात श्रीराम हे सीता, लक्ष्मण, हनुमान इत्यादींसह पुष्पक विमानातून श्रीलंकेहून अयोध्येला परत येत असतांनाचे चित्र होते; पण हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना श्रीरामाचे अस्तित्व आणि आदर्श मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी हेही चित्र हटवले.

राज्यघटनेचा चौथा भाग ‘केंद्र सरकारचे राज्यासंबंधी काय धोरण असावे ?’, याचे मार्गदर्शन करणारा आहे. त्यावर कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण हे अर्जुनाला उपदेश देतांनाचे म्हणजेच गीता सांगत असल्याचे चित्र होते. खरे तर श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून केवळ अर्जुनालाच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला त्यांच्या हिताचे गुह्य ज्ञान सांगितले होते. गीता हा ग्रंथ केवळ हिंदूसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आहे; पण हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना श्रीकृष्ण हे हिंदूंचे दैवत होते आणि त्यांनी ही गीता सांगितली; म्हणून त्यांचे चित्र मान्य नव्हते; म्हणून त्यांनी हेही चित्र राज्यघटनेतून हटवले.

९. राज्यघटनेतील सर्व संस्कृती आणि परंपरा यांचा अभिमान वृद्धींगत करणारी चित्रे हटवली !

९ अ. संस्कृतीदर्शक चित्रे ! : राज्यघटनेच्या ५ व्या भागात भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना ज्ञानाचा उपदेश देत असतांनाचे चित्र होते. ६ व्या भागात भगवान महावीर, तर ७ व्या भागात सम्राट अशोक बौद्ध भिक्षूंसमवेत चर्चा करत असल्याचे चित्र होते. ८ व्या भागात रामभक्त हनुमानाचे चित्र होते. या चित्रात हनुमान माता सीतेच्या शोधात आकाशात उडतांना दाखवले होते. ९ व्या भागात महाराज विक्रमादित्य त्यांच्या सिंहासनावर बसून न्यायदान करत असल्याचे चित्र होते. विक्रमादित्य किती न्यायप्रिय आणि पराक्रमी होते, याविषयीच्या ३२ कथा ‘सिंहासनबत्तीशी’ या प्रसिद्ध ग्रंथात सांगितल्या आहेत. १० व्या भागात भारताच्या प्राचीन काळातील जगत्विख्यात असणार्‍या नांलदा विद्यापिठाचे चित्र होते. या विद्यापिठाचा १२ व्या शतकात धर्मवेडा मुसलमान शासक बख्तियार खिलजी याने पुरता विध्वंस करून तेथील अतीमौल्यवान असणार्‍या लाखो ग्रंथांची राखरांगोळी केली होती. तेथील शेकडो विद्वान हिंदु आचार्य आणि बौद्ध भिक्षू यांचा शिरच्छेद केला होता. तेथील ग्रंथांची होळी ६ मास धुमसत होती. राज्यघटनेच्या ११ व्या भागात राजा भरत यांचे चित्र होते. राजा दुष्यंत आणि कव्वमुनींची मानलेली कन्या शकुंतला यांना ‘भरत’ नावाचा अत्यंत पराक्रमी पुत्र होता. त्याच्या नावावरून या देशाला ‘भारत’ हे नामामिधान प्राप्त झाले. १२ व्या भागात नटराजाच्या रूपात भगवान शंकराचे छायाचित्र होते. १३ व्या भागात राजा भगिरथाने गंगेला तिच्या तपस्येने प्रसन्न करून पृथ्वीतलावर कसे आणले, हा प्रसंग दर्शवणारे चित्र होते.

राज्यघटनेच्या १५ व्या भागात छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांची चित्रे होती. या दोन महापुरुषांचा जन्म झाला नसता, तर आजपर्यंत भारतात एकही हिंदु बौद्ध, जैन, शीख, पारशी शेष राहिला नसता. हा १५ वा भाग भारतातील निवडणुका आणि त्या संबंधातील कायदे यांचा आहे. नेमक्या याच भागात वरील दोन महापुरुषांची चित्रे प्रकाशित करण्यामागचा घटनाकारांचा हाच उद्देश होता की, मतदान करण्यापूर्वी मतदारांनी त्यांच्या दृष्टीसमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांचा अन् त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून जात, पंथ, संप्रदाय, भाषा, प्रांत या कशाचाही विचार न करता जो नेता आणि राजकीय पक्ष हिंदूंचे अन् राष्ट्राचे हित सर्वाेपरी मानून कार्य करतो, त्यानांच मतदान करावे.

९ आ. शौर्याची प्रतीके : ग्रंथांच्या १६ व्या भागात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे चित्र होते. राणी लक्ष्मीबाईंनी ‘मेरी झांसी नहीं दुंगी’, अशी गर्जना करून अल्पवयीन पुत्र पाठीशी बांधून इंग्रजांशी घनघोर संग्राम केला होता आणि हौतात्म्य पत्करले होते अन् या देशातील स्त्रियाही किती शूर, देशभक्त आणि प्रसंग पडल्यास प्राणाचीही पर्वा करणार्‍या नसतात, याचा प्रत्यय जगाला आणून दिला होता. १९ व्या भागात आझाद हिंद सेनेला नेताजी सुभाषचंद्र बोस मानवंदना (सॅल्युट) देत असतानांचे छायाचित्र होते. पंडित नेहरूंच्या मनात सुभाषबाबूंविषयी भयानक द्वेष होता. भाग २० मध्ये भारताच्या उत्तरी सीमांचे रक्षण करणारा नगाधिराज हिमालयाचे, तर २१ व्या भागात राजस्थानमधील वाळवंट आणि त्यातून एक सजवलेला उंट चालत असल्याचे छायाचित्र होते. २२ व्या भागात समुद्रात लाटेशी टक्कर देणार्‍या एका भारतीय नौकेचे छायाचित्र होते. भारतात पुष्कळ प्राचीन काळापासून मजबूत नौका बांधण्यात येत होत्या, याचे अनेक पुरावे आता हडप्पा आणि मोहोंजोदडो येथील उत्खननातून जगासमोर आले आहेत. या नौकाद्वारे सर्व जगभर प्रवास करून भारतीय व्यापारी विविध वस्तूंचा व्यापार करत असत आणि या नौकाद्वारे प्रवास करूनच भारतीय विद्वानांनी सर्व जगात भारतीय धर्म, संस्कृती अन् सभ्यता यांचा प्रचार केला होता.

९ इ. हिंदूंना नामोहरम करणारे पालट घडवले ! : या सर्व चित्रांवरून हिंदु धर्म, संस्कृती, सभ्यता, इतिहास, हिंदु, बौद्ध, जैन, शीख या धर्मपंथांतील महापुरुषांचे दर्शन होत होते; पण हिंदुद्वेष्ट्या पंडित नेहरूंना हेच नको होते. त्यांना भारताचे एका ‘सेक्युलर’ म्हणजेच मुसलमान किंवा ख्रिस्ती देशात रूपांतर करायचे होते. राज्यघटनेत हवे तसे हिंदूंना नामोहरम करणारे पालट घडवायचे होते. या कार्यात वरील सर्व चित्रांमुळे अडचणी आल्या असत्या; म्हणून राज्यघटनेतून त्यांनी वरील सर्व चित्रे हटवली आणि एक प्रकारे इंदिरा गांधी यांचा राज्यघटनेच्या मूळ ढाच्यात ‘सेक्युलर’ हा घातक शब्द जुलमाने घुसडण्याचा मार्ग पंडित नेहरूंनी सुलभ करून ठेवला.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ