कल्याण येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी !

कल्याण-डोंबिवलीमध्ये वर्षभरात ७-८ मंदिरांत चोर्‍या

प्रतिकात्मक छायाचित्र

कल्याण – कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी करून चोरट्यांनी १५ सहस्र रुपयांचा ऐवज, १४ पितळेची भांडी चोरून नेली आहेत. चोरट्याने मंदिरावर पाळत ठेवून मंदिराच्या मुख्य प्रवेशमार्गातील दरवाजा धारदार कटावणीने उघडून मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात असलेली दानपेटी, मंदिराच्या गर्भगृहाजवळील खोलीत देवासाठी लागणारे ताम्हण, पंचपाळ, टाळ आदी  पितळेची १२ भांडी चोरून नेली. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे. गेल्या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीमधील ७-८ मंदिरांमध्ये चोर्‍या झाल्या असून मंदिरांमधील दानपेट्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

सकाळी नेहमीप्रमाणे पुजारी मंदिर उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना मंदिराचा मुख्य दरवाजा तोडला असल्याचे आणि मंदिरात चोरी झाले असल्याचे दिसले. पुजार्‍याने ही माहिती तातडीने या मंदिराचे खजिनदार जगदीश बाळकृष्ण तरे यांना दिली.

संपादकीय भूमिका

संपूर्ण देशभरात प्रतिदिन मंदिरांमध्ये चोर्‍या होत असल्याची वृत्ते समोर येत असतात त्या रोखण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारे गांभीर्याने पहात आहेत आणि उपाययोजना काढत आहेत, असे कुठेच दिसून येत नाही, हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद आहे !