यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन
कोल्हापूर – यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदने देण्यात आले.
१. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना हातकणंगले तालुकाध्यक्ष सौ. वनिता पाटील, जैन पदवीधर संघटना धर्मरक्षा अध्यक्ष सौ. सुप्रिया पाटील, धर्मप्रेमी सौ. मनीषा जगताप आणि श्री. प्रमोद जगताप, रणरागिणी शाखेच्या सौ. प्रीती पवार, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते.
२. शिरोळ तहसीलदार कार्यालयात अव्वल कारकून अ.का. मुंजारे यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी हिंदु परिषद तालुकामंत्री मेजर (निवृत्त) सुनील पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रशांत धुळासावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे, श्री. मधुसूदन दळवी, सर्वश्री धनंजय यादव, संतोष शिंदे, सुहास ओगले, बाबासो कोळी, आदित्य माने, अविनाश कोल्हापुरे, मोहन घोटणे, श्रेयस कागले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. संजय घाटगे उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाशासनकर्त्यांनी हिंदुहितासाठी लवकरातलवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा ! |