J&K : काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारे ६ सरकारी कर्मचारी बडतर्फ

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा(Manoj Sinha) यांनी आतंकवाद्यांसाठी काम करणार्‍या ६ सरकारी कर्मचार्‍यांना बडतर्फ केले आहे. अमली पदार्थांचा व्यवसाय करून त्या पैशातून ते आतंकवाद्यांना साहाय्य करत होते. या ६ जणांपैकी ५ जण पोलीस कर्मचारी, तर १ शिक्षक आहे. हवालदार फारुख अहमद शेख, खालिद हुसेन शाह, रहमत शाह, इर्शाद अहमद चाकू, सैफ दिन आणि सरकारी शिक्षक नझम दिन यांचा यात समावेश आहे. हे सर्व पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने सिद्ध केलेल्या आतंकवादी जाळ्याशी जोडलेले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रहित केल्यापासून अशा ७० देशद्रोही कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर त्यांना कारागृहात टाकून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !