Bangladesh Protests : बांगलादेशात पुन्‍हा चालू झालेल्‍या आंदोलनात २ जण ठार, तर १०० हून अधिक जण घायाळ

बांगलादेशातील आरक्षणाविरोधात आंदोलन

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात आरक्षणाविरोधात नुकत्‍याच झालेल्‍या हिंसाचारात ठार झालेल्‍या २०० हून अधिक लोकांच्‍या न्‍यायाच्‍या मागणीसाठी बांगलादेशामध्‍ये पुन्‍हा एकदा आंदोलन चालू झाले आहे. २ ऑगस्‍ट या दिवशी आंदोलनाच्‍या वेळी झालेल्‍या हिंसाचारात २ जणांचा मृत्‍यू झाला, तर १०० हून अधिक घायाळ झाले. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयानंतर परिस्‍थिती शांत झाली होती; मात्र आता विद्यार्थी पुन्‍हा एकदा रस्‍त्‍यावर उतरले आहेत.

ढाक्‍यातील काही भागात २ सहस्रांहून हून अधिक निदर्शक जमले होते. ते सरकारविरोधी घोषणा देत होते. ढाक्‍याच्‍या उत्तर भागात पोलिसांची विद्यार्थ्‍यांशी झटापट झाली. दगडफेक करणार्‍या आंदोलकांना पांगवण्‍यासाठी सुरक्षादलांनी अश्रुधुराच्‍या नळकांड्या फोडल्‍या.