Delhi Old Woman Rape : ८० वर्षांच्या आजारी वृद्धेवर बलात्कार करणार्या आरोपीला १२ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
नवी देहली : २ वर्षांपासून एका ८० वर्षांच्या महिलेवर बलात्कार करणार्या नराधमाला येथील तीस हजारी न्यायालयाने १२ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीचे वय, त्याचे कौटुंबिक दायित्व आणि त्याला सुधारण्याची संधी देण्याचा विचार करून १२ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच पीडितेला योग्य मोबदला देण्यासाठी हे प्रकरण देहलीच्या न्यायिक सेवा प्राधिकरणाकडे पाठवले.
Accused who raped 80-year-old ailing woman sentenced to 12 years rigorous imprisonment
Such lustful people should be given the death penalty, only then such perverts can be restrained.#CrimeWatch https://t.co/ImBH9xGv9M
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 4, 2024
१. अंकित हा चोरीच्या उद्देशाने घरात शिरला होता. पीडित महिलेचे कमरेच्या खालचे शरीर काम करत नसल्यामुळे ती अनेक वर्ष अंथरुणाला खिळून आहे. अंकितने महिलेची अवस्था पाहून तिच्यावर बलात्कार केला. महिला आरोपीला हात जोडून विनंती करत होती; मात्र त्याने तिचे म्हणणे न ऐकता दुष्कृत्य केले, तसेच तिला मारहाण करून भ्रमणभाष आणि इतर वस्तू चोरून पळ काढला.
२. न्यायालयाने निकाल देतांना म्हटले की, बलात्कारासारखा गुन्हा हा पीडितेच्या आत्म्याला वेदना देणारा आहे. यामुळे पीडित महिलेला अपमानित आयुष्य जगावे लागते. तिचा आत्मविश्वास नाहीसा होतो. हा गुन्हा सामाजिक आणि नैतिक मूल्यांना धक्का पोचवणारा आहे. गुन्हा कसा घडला ?, याचे पुरावे आपल्यासमोर नाहीत; मात्र आरोपीने केवळ वासना शमवण्यासाठी हे कृत्य केले, असे दिसते. त्याने पीडितेला केवळ वासना शमवण्याचे साधन बनवले.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, असेच जनतेला वाटेल ! अशा शिक्षांमुळेच वासनांधांवर वचक बसू शकतो ! |