Hindu Hatred DMK : (म्हणे) ‘प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही !’ – द्रमुकचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर
तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर यांचे विधान
चेन्नई (तमिळनाडू) : प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. प्रभु रामाला लोक अवतार मानतात. अवतार हे जन्म घेत नाहीत. (‘अवतार’ शब्दाचा अर्थही ज्ञात नसलेले शिवशंकर यांनी या माध्यमातून त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरीच स्पष्ट केली आहे ! – संपादक) आपल्या इतिहासाची मोडतोड केली गेली आहे. आपला स्वतःचा इतिहास लपवून दुसराच इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न होत आहे, असे संतापजनक आणि निराधार विधान तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर यांनी केले. चेन्नईजवळ असलेल्या अरीयलूर जिल्ह्यात चोल साम्राज्याचे पहिले राजे राजेंद्र यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
‘There is no historical evidence of Bhagwan Shri Ram’s existence!’ – Statement by Tamil Nadu’s ruling #DMK Minister S.S. Shivshankar
There are numerous historical references to the existence of Bhagwan Shri Ram. Besides this, archaeology and astronomy also confirm Bhagwan Shri… pic.twitter.com/v0KPDeH5Xu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 3, 2024
शिवशंकर पुढे म्हणाले की,
१. राजेंद्र चोल यांनी तलाव बांधले, तसेच मंदिरांची उभारणी केली. चोल राजांचे नाव असलेले शिलालेख आणि हस्तलिखित दस्ताऐवज मिळाले आहेत; पण प्रभु श्रीराम यांच्या अस्तित्वासंदर्भात कोणताही ऐतिहासिक पुरावा सापडत नाही.
द्रमुक पक्षाला प्रभु श्रीरामाचा इतका तिटकारा का ? – भाजपशिवशंकर यांच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई म्हणाले की, द्रमुक पक्षाला प्रभु श्रीरामाचा इतका तिटकारा का ? त्यांनी प्रभु श्रीरामाचा उल्लेख आताच का काढला ? नवीन संसदेच्या इमारतीमध्ये जेव्हा चोल साम्राज्याचा सेंन्गोल (जुन्या काळातील राजदंड) ठेवला गेला, तेव्हा याच लोकांनी त्यास विरोध केला होता. तमिळनाडूचा इतिहास वर्ष १९६७ पासून चालू होतो, असे वाटणार्या लोकांना आता देशाच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहास यांविषयी प्रेम वाटते. हे हास्यास्पद नाही का ?
वर्ष १९६७ मध्ये द्रमुक पक्षाची प्रथमच राज्यात सत्ता स्थापन झाली होती. |
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराममंदिराचे उद़्घाटन करतांना सांगितले होते की, काही सहस्र वर्षांपूर्वी प्रभु श्रीराम येथे रहात होते. प्रत्यक्षात प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे हा इतिहास नाही. प्रभु श्रीरामाविषयीचे दावे करून समाजाची दिशाभूल केली जात आहे.
एस्.एस्. शिवशंकर यांचे वक्तव्य हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ! – हिंदु जनजागृती समितीया प्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांना ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुळात द्रमुक पक्षाला धर्माचा अभ्यास नाही. त्याची स्थापनाच धर्माला विरोध म्हणून करण्यात आली आहे. ज्या क्षेत्राचा अभ्यास नाही, त्याविषयी माणसाने बोलू नये. डॉक्टरही त्याचा अभ्यास असलेल्या आजाराविषयीच बोलतो. आपल्याकडे मात्र राजकीय पक्ष अशा प्रकारे कोणत्याही क्षेत्राविषयी बोलत रहातात. श्रीरामजन्मूभी ऐतिहासिक असल्याचे स्वत: सर्वोच्च न्यायालयानेच मान्य केले असून त्याने दिलेल्या निर्णयानंतरच श्रीराममंदिराची अयोध्येत उभारणी झाली. त्यामुळे एस्.एस्. शिवशंकर यांचे वक्तव्य हे खरेतर न्यायालयाच्या निकालाचा अवमानच होय. वस्तुत: ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) करण्यावरून गुन्हे नोंद करणारे अशी वक्तव्ये करणार्यांच्या विरोधात गुन्हे का नोंद करत नाहीत ? |
संपादकीय भूमिका
|