कल्याण येथे होर्डिंग कोसळून तिघे घायाळ
कल्याण – येथील सहजानंद चौकात २० X १५ फूट आकाराचे मोठे होर्डिंग कोसळून ३ जण घायाळ झाले आहेत, तर एका वाहनाची किरकोळ हानी झाली. होर्डिंग कोसळल्याने तेथे मोठी वाहतूककोंडीही झाली. होर्डिंग हटवण्यासाठी अग्नीशमनदलाचे पथक घटनास्थळी आले होते.
‘होर्डिंग कोसळतांना सुदैवाने त्या भागात पादचारी, वाहनांची वर्दळ अल्प होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती’, असे परिसरातील व्यापार्यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. इतके दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने या होर्डिंगच्या लाकडी आधाराचा सांगाडा सैल होऊन ते कोसळले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.