श्रीराममंदिराविषयी अफवा पसरवणार्या मुसलमानाला अटक
तक्रार करणार्या हिंदु तरुणाला दिली होती धमकी
अयोध्या (उत्तरप्रदेश) – ‘वंचितांना श्रीराममंदिरात प्रवेश दिला नाही’, अशी अफवा व्हिडिओद्वारे पसरवणारा शान-ए-आलम याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध हिंदु तरुणाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम ५०५ आणि ५०५ (२) कलम अंतर्गत गुन्हा नोंदवला. आलम याला याची माहिती मिळाल्यावर तो त्याच्या साथीदारांसह हिंदु तरुणाच्या घरी गेला आणि त्याला तक्रार मागे न घेतल्यास मारहाण करण्याची धमकी दिली होती. (गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपी उघडपणे तक्रारादाराला मारहाण करण्याची धमकी देण्यास मोकळा कसा काय रहातो ? पोलिसांनी त्याला तात्काळ अटक का केली नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिकाअशांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा व्हायला हवी ! अशा गुन्हेगारांविषयी ढोंगी निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाव जोपासणारे राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ? |