‘एस्.टी.’ची कोल्‍हापूर-मुंबई आणि कोल्‍हापूर-शिर्डी शयनयान बससेवा चालू !

‘एस्.टी.’ची कोल्‍हापूर-मुंबई शयनयान सेवेची गाडी

कोल्‍हापूर – ‘एस्.टी.’च्‍या कोल्‍हापूर विभागासाठी ६ नवीन शयनयान (स्‍लीपर) गाड्या प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्‍यांपैकी प्रतिदिन कोल्‍हापूर-बोरीवली (रात्री ८.३० वाजता), कोल्‍हापूर-मुंबई (रात्री ९.३० वाजता), तसेच कोल्‍हापूर-शिर्डी (रात्री ८ वाजता) या गाड्या चालू करण्‍यात आल्‍या आहेत. एका बसची प्रवासीक्षमता ३० इतकी आहे. या गाड्यांचे आगाऊ आरक्षण उपलब्‍ध आहे. या गाड्यांमध्‍ये महिलांना ५० टक्‍के सवलत, तर ‘अमृत ज्‍येष्‍ठ नागरिक योजने’च्‍या अंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना १०० टक्‍के सवलत लागू आहे. तरी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्‍यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्‍के यांनी केले आहे.