‘NEET-UG 2024’ : ‘नीट-युजी २०२४’ परीक्षा प्रकरणात कोणत्‍याही प्रकारचे उल्लंघन झालेले नाही !

  • सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय

  • पुनर्परीक्षा घेण्‍यास नकार !

सर्वोच्‍च न्‍यायालय

नवी देहली – सर्वोच्‍च न्‍यायालयाने(Supreme Court) ‘नीट-युजी २०२४’ (राष्‍ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा)(NEET-UG 2024) परीक्षा प्रकरणात कोणत्‍याही प्रकारचे उल्लंघन झालेले नाही’, असे सांगत पुनर्परीक्षा घेण्‍यास नकार दिला. ‘प्रश्‍नपत्रिका फुटण्‍याचा प्रकार व्‍यापक प्रमाणात झालेला नाही, तर केवळ बिहारची राजधानी पाटलीपुत्र आणि हजारीबाग पुरताच मर्यादित होता; मात्र या प्रकरणात ‘एन्.टी.ए.’ने (‘नॅशनल टेस्‍ट एजन्‍सी’ने) यापुढे काळजी घ्‍यायला हवी’, असे न्‍यायालयाने म्‍हटले आहे. ‘नीट’ पेपर फुटीवरून देशभरातील विद्यार्थ्‍यांकडून संताप व्‍यक्‍त करण्‍यात आला होता. या प्रकरणावरून सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आली होती.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने सांगितले की, यावर्षी जी गडबड झाली, त्‍याविषयी केंद्र सरकारने विचार केला पाहिजे. यापुढे अशा घटना व्‍हायला नको. संपूर्ण परीक्षापद्धत सुरळीत आहे. या प्रकरणाविषयी स्‍थापन केलेल्‍या समितीने तिचा अहवाल ३० सप्‍टेंबर २०२४ पर्यंतचा सादर करावा, असेही न्‍यायालयाने म्‍हटले आहे.