जे संयुक्त राष्ट्रांना कळते, ते भारताला का कळत नाही ?
‘संयुक्त राष्ट्रांच्या नव्या अहवालात भारतासंदर्भात एक मोठा दावा करण्यात आला आहे. ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ ही आतंकवादी संघटना भारतात मोठ्या प्रमाणावर आक्रमण करण्यात अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे तिला भारतात उपस्थित असलेल्या तिच्या आतंकवाद्यांच्या साहाय्याने अशा लोकांची भरती करायची आहे, जे भारतात एकट्याने आतंकवादी घटना घडवून आणू शकतात. याला ‘लोन वूल्फ अटॅक’ (एकट्याने केले जाणारे आक्रमण) या नावाने संबोधले जाते.’ (१.८.२०२४)