आनंदाची पर्वणी असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात यवतमाळ जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती
११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव सोहळा महर्षींच्या आज्ञेनुसार ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा ब्रह्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्याची संधी साधकांना मिळाली. ब्रह्मोत्सवाच्या काळात यवतमाळ जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. शांताबाई घोंगडे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६४ वर्षे)
१ अ. मानसपूजा करतांना साधिकेला रथात बसलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे दर्शन होणे : ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी मानसपूजा करतांना मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना प्रार्थना करत होते. त्या वेळी मला रथात बसलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. गुरुदेवांच्या चरणांतून पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. तो रथ संपूर्ण भारतभर फिरत होता आणि रथाच्या भोवती एक धनुष्यबाण फिरतांना दिसत होता. मी मानसपूजेत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणांवर मोगर्याची फुले वहात असतांना मला चंदनाचा सुवास आला. गुरुदेव रथातून खाली उतरतांना मी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. त्यावरून ते चालत असतांना त्या पाकळ्यांमधून ‘ॐ’चा आवाज येत होता. हे सर्व दृश्य पाहून माझा भाव जागृत झाला. ही अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
२. सौ. ज्योती अर्धापूरकर
२ अ. सोहळा बघत असतांना ‘आपण देवलोकात आहोत’, असे साधिकेला जाणवणे : जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी मला उत्साह आणि आनंद जाणवत होता. त्या दिवशी सकाळी कोकिळा वीस मिनिटे मधुर गायन करत होती आणि पक्षी किलबिलाट करत होते. पूर्ण वातावरणात चैतन्य जाणवत होते. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साक्षात् श्रीविष्णु अन् श्री लक्ष्मी यांचीच रूपे आहेत’, असे मला दिसत होते. प.पू. गुरुमाऊलींच्या जागी मला पिवळ्या रंगाचा चैतन्यदायी प्रकाश दिसत होता. हा सोहळा बघत असतांना ‘आपण देवलोकात आहोत’, असे मला जाणवत होते. पूर्ण कार्यक्रम चालू असतांना माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू वहात होते.’
३. सौ. छबू बगमारे
३ अ. सोहळ्याच्या दिवशी सकाळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर स्वतःच्या हृदयात आहेत’, असे साधिकेला जाणवणे : ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर प्रत्यक्ष माझ्या समोर प्रकट झाले आहेत’, असे मला दिसले. त्यांना पाहून माझे मन भरून आले आणि माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. त्या भावाश्रूंनी मी त्यांच्या चरणांना अभिषेक केला. नंतर मला एक भव्य रथ आणि पिवळा प्रकाश दिसू लागला. त्या रथामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दिसत होत्या. त्यांना पाहून माझी भावजागृती झाली. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर माझ्या हृदयात आहेत’, असे मला जाणवत होते. दिवसभर माझी भावजागृती होत होती.
हा ब्रह्मोत्सव सोहळा स्थुलातून अनुभवायला मिळाला, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
४. सौ. कल्पना खामणकर
४ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेने सोहळ्यात भावावस्था अनुभवता येणे : ‘जन्मोत्सवाच्या दिनी ‘श्री गुरुमाऊली प्रत्यक्ष श्रीविष्णु आहेत आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्री लक्ष्मीची रूपे आहेत’, असे मला जाणवले. ‘हा सोहळा आपण देवलोकात बघत आहोत’, असे जाणवून मला पुष्कळ आनंद ग्रहण करता आला. श्री गुरुमाऊलींच्या कृपेने मला भावावस्था अनुभवता आली.’
५. श्री. लहू खामणकर
५ अ. साधकांच्या अनेक जन्मांचा पुण्यसंचय म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा ब्रह्मोत्सव सोहळा अनुभवता येणे : ‘श्री गुरुमाऊलींनी ब्रह्मोत्सवाचा देवदुर्लभ सोहळा सहस्रो साधकांना अनुभवायला दिला. या सोहळ्यासाठी आलेला प्रत्येक साधक भावावस्थेत होता. ही भावावस्था आठवून श्री. विनायक शानभागदादांनी सांगितलेले सूत्र आठवले, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी आम्हा सर्व साधकांना जन्मोजन्मी आपल्या समवेत ठेवले आहे आणि ते सर्वांना मोक्षालाही नेणार आहेत.’ आम्हा शूद्र जिवांना सतत सत्संगात ठेवणार्या अशा श्री गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
सर्व लिखाणाचा दिनांक (मे २०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |