नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय !
नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येते. जसे व्यक्तीखेरीज सावलीला अस्तित्व नाही, तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही, तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही; कारण व्यक्तीच्या हालचालीप्रमाणेच तिची हालचाल होते. व्यक्ती दिसली नाही, तरी तिची सावली जशी दिसते, त्याप्रमाणे मायेचे अस्तित्व मात्र जाणवते. मायेची सत्ता भगवंतावर नाही. भगवंत जर कृपण असेल, तर तो नामभक्ती देण्यात आहे. म्हणून त्याला आळवावे आणि ‘तुझ्या नामाचे प्रेम दे’, हेच मागावे. म्हणून आपण तेच मागावे. रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे. विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण, तर नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय !
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(साभार : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फेसबुक)