AIDS Vaccine : एड्सग्रस्तांसाठी बनवण्यात आली लस !
महिलांवर केलेल्या चाचणीला मिळाले १०० टक्के यश
लंडन (ब्रिटन) – एच्.आय.व्ही. (एड्स) झालेल्या रुग्णांसाठी लस शोधण्यात आली आहे. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये या संदर्भात संशोधन प्रकाशित झाले आहे. एका वर्षांत या लसीचे २ डोस इंजेक्शनमधून घेतल्यानंतर रुग्ण महिलांमध्ये १०० टक्के चांगला परिणाम दिसून आला आहे. तसेच त्यांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. या लसीचे नाव ‘लेनकापाविर’ ठेवण्यात आले आहे. अमेरिकेतील बायोफार्मास्युटिकल आस्थशपन ‘जीलेड सायसेन्स’कडून ही लस विकसित करण्यात आली आहे.
Finally a vaccine to cure AIDS.
▫️ A trial on women showed 100% success rate.#HealthCare#HealthAndWellness pic.twitter.com/xdfuDivgeq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 2, 2024
या लसीची चाचणी करण्यासाठी दक्षिण आफ्रीका आणि युगांडा येथील किशोरवयीन मुली अन् तरुणी यांना सहभागी करण्यात आले होते. ‘ज्यांना त्यांच्या जोडीदाराकडून या आजाराचा धोका आहे त्यांच्यावरही या औषधाचा चांगला परिणाम होईल’, असे म्हटले जात आहे.