Firhad Hakim : (म्‍हणे) ‘मी मुसलमान असूनही दुर्गापूजेचे नियमितपणे आयोजन करतो !’ – बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम

‘जे इस्‍लाममध्‍ये जन्‍मले नाहीत, ते दुर्दैवी आहेत’, असे वक्‍तव्‍य करणारे बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम यांचा नवा दावा !

बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम

कोलकाता (बंगाल) – बंगाल राज्‍य सरकारमधील मंत्री आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी गेल्‍या महिन्‍यात म्‍हटले होते की, ‘जे इस्‍लाममध्‍ये जन्‍मलेले नाहीत, ते दुर्दैवी आहेत. आम्‍ही (मुसलमानांनी) त्‍यांना इस्‍लामच्‍या कक्षेत आणले पाहिजे.’ त्‍यांच्‍या या विधानाला विरोध झाल्‍यानंतर त्‍यांनी आता बंगाल विधानसभेत १ ऑगस्‍ट या दिवशी नवा दावा केला आहे. ते म्‍हणाले की, मी मुसलमान असूनही दुर्गापूजा आणि कालीपूजा नियमितपणे आयोजित करतो.

हकीम पुढे म्‍हणाले की, जेव्‍हा मी एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर देण्‍यासाठी (विधानसभेत) उभा रहातो, तेव्‍हा भाजपचे आमदार सभागृहातून बाहेर पडतात. माझ्‍या कोणत्‍याही टिपण्‍यांचा चुकीचा अर्थ लावला जात असल्‍यास मी काय करू शकतो ? भाजपचे लोक मला धर्मनिरपेक्ष मानतात कि नाही ? मी कधीही इतर कोणत्‍याही धर्माच्‍या लोकांचा अपमान केला नाही आणि माझ्‍या शेवटच्‍या श्‍वासापर्यंत मी तसे करणार नाही. कुणालाही दुखवण्‍याचा माझा हेतू नव्‍हता. माझा जन्‍म धर्मनिरपेक्ष कुटुंबात झाला आणि भविष्‍यातही मी धर्मनिरपेक्षच राहीन. (असे आहे, तर हकीम यांनी धर्मनिरपेक्षतेचा डोस बंगालमधील मुसलमानांनाही पाजला पाहिजे आणि तेथील हिंदूंच्‍या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे, अन्‍यथा हे सर्व ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ठरेल, हे वेगळे सांगायला नको ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • फिरहाद यांच्‍या ‘जे इस्‍लाममध्‍ये जन्‍मले नाहीत, ते दुर्दैवी आहेत’, या वक्‍तव्‍यावरून त्‍यांच्‍या मनात काय चालले आहे ?, हे स्‍पष्‍ट होते ! अशांची धर्मनिरपेक्षता किती बेगडी आहे, हे हिंदूंनी जाणावे !
  • दुर्गापूजेचे आयोजन करणारे फिरहाद हे दुर्गापूजेवर त्‍यांच्‍या बांधवांकडून होणार्‍या आक्रमणांविषयी कधी काही बोलत नाहीत ? किंवा ही आक्रमणे रोखण्‍यासाठी प्रयत्न का केले नाहीत ?