१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत विशेष दर्शन व्यवस्था बंद !
|
नाशिक – श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची पुष्कळ गर्दी होते. यासाठी देवस्थानच्या वतीने १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची विशेष (व्हीआयपी) दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे. या काळात त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत खुले रहाणार असून श्रावणातील सोमवारी पहाटे ४ वाजता मंदिर खुले केले जाणार आहे. सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळेत प्रतिदिन २० अतीमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनाची व्यवस्था केली जाईल. धर्मदर्शन आणि देणगी दर्शन नोंदणी ऑनलाईन करण्याची व्यवस्था लवकरच कार्यान्वित केली जात आहे.