अर्जांच्या तांत्रिक पडताळणीसाठी निवडक महिलांच्या खात्यात १ रुपया जमा होणार !
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना !
मुंबई – महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी सध्या १ कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांची तांत्रिक पडताळणी केली जात आहे. त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यात १ रुपया जमा केला जाणार आहे. हा एक रुपया सर्व महिलांच्या खात्यात येणार नाही. हा सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.