यशश्री शिंदे हिची हत्या करणार्याला भरचौकात फाशी द्या ! – संतप्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर !
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर), १ ऑगस्ट (वार्ता.) – नवी मुंबई उरण येथील कु. यशश्री शिंदे (वय २२ वर्षे) हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. ही हत्या करणार्याला भरचौकात फाशी द्या आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा, याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून ३१ जुलैच्या सायंकाळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना देण्यात आले. ‘आपले निवेदन त्वरित फॅक्सद्वारे शासनाला पाठवतो’, असे त्यांनी सांगितले.
या वेळी भाजप शहर सरचिटणीस श्री. सुनिल ताडे, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस श्री. राजेंद्र दाईंगडे, सरचिटणीस श्री. संतोष जाधव, अधिवक्ता प्रसाद काळे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे, मनसे जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष श्री. महेश पोरे, मनसे स्वयंरोजगार शहर उपसंघटक श्री. सुमंत रत्नपारखे, श्री. प्रताप दाईंगडे, गणेश हार्डवेअरचे श्री. यश खैरे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संजय घाटगे, प्रकाश पवार, सुनील चौधरी आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.