नागरिकांच्या सुरक्षेसाठी उरणमध्ये मुसलमानांना ‘गावबंदी’ करावी !
भाजपचे नेते आणि स्वराज्य ग्रुप, खोपटेचे संस्थापक प्रशांत ठाकूर यांची मागणी !
मुंबई – गावातील महिला आणि अन्य सर्व नागरिक यांच्या सुरक्षेसाठी उरण गावातून मुसलमानांना ‘गावबंदी’ करावी, अशी मागणी भाजपचे आणि स्वराज्य ग्रुप, खोपटेचे संस्थापक प्रशांत ठाकूर यांनी ३१ जुलै या दिवशी बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतीकडे केली आहे. उरण (जिल्हा रायगड) येथे कु. यशश्री शिंदे या हिंदु युवतीला दाऊद शेख या धर्मांधाने लव्ह जिहादमध्ये फसवून तिची निर्घृण हत्या केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात पूर्वीपासून हिंदु-आगरी समाज बहुसंख्येने वास्तव्य करत आहे. मागील काही वर्षांपासून मात्र ग्रामपंचायतीच्या हद्दीत भंगारवाले, मटणवाले, केशकर्तन करणारे आदी व्यवसाय करण्यासाठी मुसलमान मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे रहात आहेत. गावात रहाणार्या मुसलमानांसमवेत अनेक बाहेरील मुसलमान अवैधपणे रहात आहेत. अशा मुसलमानांकडून गावामध्ये ‘लव्ह जिहाद’ किंवा अन्य कोणताही अनुचित प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावात अनधिकृतपणे रहाणार्या आणि व्यवसाय करणार्या मुसलमानांवर दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. या अनधिकृत विक्रेत्यांमुळे स्थानिक व्यवसायावर याचा परिणाम होत आहे.