आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर आक्रमण
मुंबई – येथून ठाण्याच्या दिशेने जात असतांना ‘फ्री वे’जवळ त्यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. विशाळगड येथील अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संभाजीराजे यांच्या समवेत गेलेल्या हिंदूंनी तेथील वस्तीवर आक्रमण केले होते. या पार्श्वभूमीवर ‘संभाजीराजे यांचे रक्त तपासून बघायला हवे’, अशी टीका केली होती. आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतही छत्रपती संभाजीराजे यांना लक्ष्य केले होते.
आव्हाड यांच्या टीकेवर स्वराज्य संघटना आक्रमक झाली होती. ‘त्यांनी लवकरात लवकर संभाजीराजे यांची क्षमा मागावी’, अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली होती. आक्रमणाचे गांभीर्य ओळखून आव्हाड यांच्या चालकाने शिताफीने वेगाने गाडी पुढे नेली. स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे.