पूजा खेडकर यांची नियुक्ती रहित करून ‘यू.पी.एस्.सी.’ने विश्वासार्हता वाढवली ! – माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी

डावीकडून माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि पूजा खेडकर

पुणे – वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्याविषयी यू.पी.एस्.सी.ने (केंद्रीय लोकसेवा आयोगाने) जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाने त्यांनी त्यांची विश्वासार्हता वाढवली आहे. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत, असे निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

धर्माधिकारी पुढे म्हणाले, ‘‘यू.पी.एस्.सी.ने पूजा खेडकर यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घोषित केले की, तिने असलेल्या प्रावधानाचा अपलाभ घेतला. त्यामुळे तिची मूळची जी निवड ही तात्पुरती होती. ती निवड रहित केली आणि पुढे या प्रकारच्या कुठल्याही परीक्षांना बसायला बंदी घातली. हे प्रकरण म्हणजे सगळ्यांनाच एक धडा आहे. अशा काही प्रावधानाचा कुणी अपलाभ घेत नाही ना ? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’’