नंदुरबार येथे रस्त्याअभावी गर्भवतीला झोळीतून नेले !

  • रुग्णालयात जाण्यासाठी ७ किलोमीटरची पायपीट

  • प्रसूतीनंतरही बांबूच्या झोळीतूनच प्रवास

पुराच्या पाण्यातून बांबूची झोळी करून जातांना 

नंदुरबार – येथील धडगाव तालुक्यातील बुन्नीपाडा येथील गर्भवती महिलेला उदय नदीतील पुराच्या पाण्यातून झोळीच्या साहाय्याने वाट काढत ७ किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात नेण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर रुग्णवाहिकेच्या साहाय्याने पाड्यापर्यंत आणले; परंतु पुढे बुन्नीपाडा येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने पुन्हा पुराच्या पाण्यातून बांबूची झोळी करून जीवघेणा प्रवास करावा लागला.

येथील रस्त्याच्या कामासाठी ४ वर्षांपूर्वी संमती मिळाली होती; पण ते काम अद्याप चालू झालेले नाही. सातपुड्यातील दुर्गम भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही मूलभूत सुविधा नागरिकांना न मिळणे, हे सर्व पक्षांना लज्जास्पद !