रामनाथी, गोवा येथे झालेल्या एका शिबिरात सौ. ज्योती नीलेश कुंभार यांना आलेल्या अनुभूती
‘३ ते ७.१.२०२४ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
१. मला ‘सनातन’ या नावातच पुष्कळ चैतन्य जाणवते.
२. मी रामनाथी आश्रमात आल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) यांचे स्मरण होऊन माझ्या मनाला पुष्कळ आनंद जाणवला.
३. मी आश्रमात प्रवेश केल्यावर मला संपूर्ण देहात पोकळी जाणवून थंडावा जाणवला.
४. मला सर्व साधकांच्या माध्यमातून निर्मळ प्रेम आणि गुरुतत्त्व अनुभवता आले.
५. ‘साधकांचा स्पर्श म्हणजे प्रत्यक्ष गुरुदेवांचाच स्पर्श आहे. साधकांच्या चेहर्यावरील निर्मळ हास्य पाहून माझी गुरुमाऊलीच हसत आहे’, असे मला अनुभवता आले.’
– सौ. ज्योती नीलेश कुंभार (वय ३४ वर्षे), सातारा (९.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |