चिपळूण येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनात मुसलमान महिलेने घुसून अश्‍लील शिवीगाळ करत केला विरोध !

  • यशश्री शिंदेच्या निर्घृण हत्येचे प्रकरण

  •  हिंदूंच्या दबावानंतरच पोलिसांनी केला महिलेवर गुन्हा नोंद !

  •  हिंदूंमध्ये प्रक्षुब्ध वातावरण

चिपळूण हिंदुत्वनिष्ठांच आंदोलन

चिपळूण, १ ऑगस्ट (वार्ता.) – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने चिपळूण येथे ‘उरण येथील यशश्री शिंदे हिची क्रूर हत्या केल्याप्रकरणी दाऊद शेख याला त्वरित फाशी व्हावी आणि महाराष्ट्रात तातडीने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत करावा’, या मागण्यांसाठी आंदोलन चालू होते. हे आंदोलन वैध मार्गाने, तसेच शांततेत चालू असतांना अचानक एका मुसलमान महिलेने आंदोलनात घुसून अश्‍लील भाषेत शिवीगाळ करून आंदोलनाला विरोध केला. त्यामुळे समस्त हिंदूंच्या भावना अत्यंत संतप्त होऊन हिंदूंनी महिलेवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची आणि तिला तेथे पाठवण्याचे षड्यंत्र कुणाचे आहे ? याविषयी तातडीने चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली. हिंदुत्वनिष्ठांच्या दबावानंतरच पोलिसांनी आसमा हनीफ परकार (गोवळकोट, चिपळूण) हिच्या विरोधात गुन्हा नोंद करून तिला अटक केली. (याचा अर्थ हिंदुत्वनिष्ठांनी दबाव आणला नसता, तर पोलीस निष्क्रीयच राहिले असते, हे स्पष्टच आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना योग्य समज देतील, अशी अपेक्षा ! – संपादक)

असा आहे घटनाक्रम !

१. चिपळूण येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन शांततेत चालू असतांना त्या ठिकाणी एका मुसलमान महिलेने आंदोलनाला विरोध करत अतिशय खालच्या थराच्या शिव्या देण्यास चालू केले.

२. पोलिसांनी त्या महिलेला प्रथम एका दुकानात नेले. त्या वेळी संतप्त हिंदूंनी ‘तिला त्वरित आमच्या कह्यात द्या’, अशी मागणी केली.

३. समस्त हिंदूंकडून रस्ता रोखण्यात आला. दोन्ही बाजूने वाहने थांबल्यानंतर मात्र पोलिसांनी त्या महिलेला संरक्षणामध्ये गाडीतून पोलीस ठाण्यामध्ये नेले.

४. त्यामुळे हिंदूंनी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी अनेक घोषणा दिल्या.

प्रतिकात्मक चित्र

५. हिंदुत्वनिष्ठ पोलीस ठाण्याजवळ पोचल्यानंतर त्यांनी ‘सदर महिलेवर कोणती कारवाई करणार ?, तिला या ठिकाणी पाठवण्यामागे कुणाचे षड्यंत्र आहे ?, चिपळूणमध्ये धार्मिक तणाव निर्माण करणारे कोण आहेत ?, याचे उत्तर आम्हाला दिल्याविना आम्ही मागे हटणार नाही’, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्याच समवेत ‘त्या महिलेवर त्वरित कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

६. पोलीस म्हणाले की, यासंदर्भात तुम्ही तक्रार प्रविष्ट (दाखल) करा. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना सर्व प्रकरण तुमच्या समोर घडलेले असतांना तुम्हीच तिच्याविरुद्ध स्वतःहून पुढाकार घेऊन गुन्हा नोंदवायला हवा, असे सांगितले.

७. त्यानंतर काही हिंदुत्वनिष्ठ प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा झाली.

९. संतप्त परिस्थिती पहाता पोलिसांनी शेवटी गुन्हा नोंद केला.

१०. भाजपच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ सेल’च्या चिपळूण शहराध्यक्षा सौ. साधना कात्रे यांनी स्वतः या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.

भाजपचे आमदार नितेश राणे आणि जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी प्रकरणाची घेतली माहिती !

भाजप आमदार नितेश राणे यांनी भ्रमणभाषवरून या घटनेची माहिती घेतली आणि योग्य कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भावना पोलीस यंत्रणेकडे व्यक्त केली. उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी ‘पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली. प्रकरण गंभीर असून पोलिसांनी हिंदूंच्या जनभावना लक्षात घ्यायला हव्या’, असे सांगितले.

चिपळूण येथील आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी !

यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या !

चिपळूण – महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे; मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदु युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत अन् त्यांच्या निर्घृण हत्या चालूच आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या !’, ‘बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा !’, अशी आग्रही मागणी चिपळूण शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल येथे १ ऑगस्ट या दिवशी हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनात करण्यात आली.

उरण येथील कु. यशश्री शिंदे (वय २२ वर्षे) हिची अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली. कु. यशश्रीची हत्या करणार्‍या नराधम आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, अशीही मागणी या आंदोलनात करण्यात आली. सध्या त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आंदोलनातील उपस्थित हिंदुत्वनिष्ठ !

या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. रामदास राणे, श्री. आशिष खातू, मनसे शहर अध्यक्ष श्री. अभिनव भुरण, युवा सेना तालुका अध्यक्ष श्री. निहार कोवळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष श्री. वसंत ताम्हणकर, भाजपच्या सौ. रसिका देवळेकर, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. शीतल रानडे, सौ. स्वाती भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षा सौ. अदिती देशपांडे, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या डॉ. गौरी याळगी आणि मोठ्या संख्येने हिंदु बांधव उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

मुसलमानांच्या आंदोलनात कधी कुणी हिंदू अशा प्रकारे घुसून आंदोलनाला विरोध करण्यास धजावू तरी शकतो का ? त्याने तसे करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याचे काय होईल, हे वेगळे सांगायला हवे का ?