Pakistani Criminals UAE : संयुक्त अरब अमिरातीमधील ५० टक्के गुन्हेगार पाकिस्तानी !
पाकिस्तानी भिकार्यांमुळे सौदी अरेबियाही हैराण !
अबू धाबी (संयुक्त अरब अमिराती) – संयुक्त अरब अमिराती आणि साऊदी अरेबिया यांसारख्या आखाती देशांनी पाकिस्तानी कामगारांविषयी चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील ५० टक्के गुन्हे पाकिस्तानी लोक करत आहेत, तर साऊदी अरेबिया पाकिस्तानातून येणार्या भिकार्यांमुळे हैराण आहे. हे सर्व खुलासे पाकिस्तानी संसदेच्या समितीत करण्यात आले आहेत.
१. पाकिस्तानी अधिकार्यांनी ही माहिती पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या विदेशी पाकिस्तान्यांसाठी स्थापन केलेल्या समितीला दिली आहे. समितीला सांगण्यात आले आहे की, संयुक्त अरब अमिरातीसारखे देश पाकिस्तानातून येणार्या कामगारांवर खूश नाहीत; कारण त्यांपैकी बहुतेक कामगार गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे. तेथे पाकिस्तानी गैरवर्तन करतात. दुबईसारख्या शहरांत ते महिलांचे विनापरवाना व्हिडिओ बनवतात.
२. पाकिस्तानातून येणार्या भिकार्यांमुळे साऊदी अरेबिया आणि इराक हेही त्रस्त आहेत. अधिकार्यांनी या समितीला सांगितले की, सप्टेंबर २०२३ मध्ये येथे अशा टोळ्या पकडल्या गेल्या, ज्या हजला जायच्या, पण नंतर तिथे भीक मागू लागल्या. आखाती देशांमध्ये पकडलेल्या भिकार्यांपैकी ९० टक्के पाकिस्तानी असल्याचेही समोर आले आहे.
संपादकीय भूमिका‘यथा राजा तथा प्रजा’ या उक्तीनुसार पाकिस्तानी जनतेचे असे वर्तन त्या देशाचे नि राज्यकर्त्यांचे चारित्र्यच दाखवते, हे लक्षात घ्या ! |