Bihar Student Firing : सुपौल (बिहार) : मोठ्या शिशूवर्गातील विद्यार्थ्‍याने तिसरीतील विद्यार्थ्‍यावर वर्गात झाडली गोळी !

सुपौल (बिहार) – येथील त्रिवेणीगंज भागात असलेल्‍या सेंट जॉन बोर्डिंग शाळेमध्‍ये घडलेल्‍या एका धक्‍कादायक घटनेत मोठ्या शिशूवर्गातील मुलाने (वय ७ वर्षे) इयत्ता तिसरीत शिकणार्‍या मुलावर (वय १२ वर्षे) गोळी झाडली. पिस्‍तूल वाकल्‍याने १२ वर्षीय मुलाच्‍या डाव्‍या तळव्‍याला गोळी लागली. त्‍याच्‍यावर उपचार चालू असून त्‍याची प्रकृती धोक्‍याबाहेर आहे.


आसिफ असे इयत्ता तिसरीत शिकणार्‍या मुलाचे नाव असून ३१ जुलैच्‍या सकाळी नमाजपठण झाल्‍यानंतर तो वर्गात परतला. त्‍यानंतर ७ वर्षीय मुलाने वर्गात येऊन आसिफवर गोळी झाडली. या घटनेमुळे प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी, तसेच पालक यांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादकीय भूमिका

एवढ्या लहान मुलाच्या हातात पिस्तुल येतेच कशी ? यातून बिहारमधील कायदा-सुव्यस्थेची कल्पना करता येईल !