Nitesh Rane : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हिंदु जनआक्रोश मोर्चांना प्रारंभ होणार ! – आमदार नितेश राणे, भाजप
लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डाशी संबंधित विषय हाताळणार
मुंबई – भाजप लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डाशी संबंधित विषय अधिक आक्रमकपणे हाताळणार आहे. आम्ही संबंधित ठिकाणी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने मोर्चे काढणार आहोत. भाजपशी संबंधित सकल हिंदु समाजाकडून ४ ऑगस्टला करमाळा (सोलापूर) येथे, तर १४ ऑगस्टला अमरावतीत हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
The Hindu Jan Akrosh Morcha to commence from the first week of August. – MLA, @NiteshNRane, BJP.
▫️The rally will deal with and spread awareness on topics related to Love J!h@d, Land J!h@d and W@qf Board.
👉 It is unfortunate that when Shiv Sena and BJP is in power, the Hindus… pic.twitter.com/Oe4wQqfWff
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 1, 2024
या दोन्ही जागांवर लोकसभेत भाजपचा पराभव झाला आहे. वर्ष २०२२ मध्ये राज्यात प्रथमच हिंदु जनआक्रोश मोर्चे निघाले होते. वर्ष २०२३ मध्ये राज्यात २४ हून अधिक मोर्चे निघाले. विश्व हिंदु परिषद आणि सनातन संस्था यांनी हे मोर्चे काढले होते, अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली. ‘या मोर्चांचे नेतृत्व कोणताही नेता, पक्ष किंवा संघटना करणार नाही. ‘आपल्या धर्मासाठी लढायला हवे’, अशी इच्छा असणारे हिंदूच या मोर्चात उतरतील’, असेही ते म्हणाले.
संपादकीय भूमिकाराज्यात शिवसेना आणि भाजप यांचे सरकार असतांना हिंदूंना असे मोर्चे काढावे लागू नयेत. सरकारनेच कठोर कारवाई आणि कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते ! |