Urinating Temple Wall : मंदिराच्या भिंतीवर लघुशंका करणार्या मुसलमानाला विरोध केल्यावर धर्मांधांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील घटना
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील राजाजीपूरम् विभागातील एफ् ब्लॉक या परिसरातील मंदिराच्या भिंतीवर लघुशंका करणार्या नदीम याला विरोध करणारे दिलीप सिंह यांच्या घरावर मुसलमानांनी आक्रमण केले. या मारहाणीत दिलीप सिंह गंभीररित्या घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.
Deadly Attack on a Hindu Youth for Objecting to a Mu$l!m Urinating on a Temple Wall
📍Lakshmanpuri (Uttar Pradesh)
Why don’t those who claim ‘Mu$l!ms are unsafe in India’ speak out about such incidents?
If a place of worship of ‘peacefuls’ were disrespected in this manner and… pic.twitter.com/SM9CDSYTPq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 1, 2024
दिलीप सिंह यांनी नदीम याला लघुशंका करण्यापासून थांबवल्यावर त्याने दिलीप यांना शिवीगाळ केली. दोघांमध्ये काही वेळ वाद झाला आणि नंतर नदीम तेथून निघून गेला. काही वेळाने नदीम त्याचे साथीदार महंमद सलीम, महंमद नफीस आणि कलीम यांना घेऊन आला. त्यांच्या हातात लाठ्या आणि लोखंडी सळ्या होत्या. त्यांनी दिलीप सिंह यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. डोक्यात लोखंडी सळीने मारल्याने ते गंभीररित्या घायाळ झाले. यानंतर धर्मांध मुसलमान पळून गेले. दिलीप सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी ३ जणांना अटक केली.
संपादकीय भूमिका
|