पुणे येथील कात्रज परिसरात २१ लाख रुपयांचे मॅफेड्रोन जप्त !
राजस्थानमधील दोघांना अटक !
पुणे – येथील कात्रज परिसरात मॅफेड्रोन (एम्.डी) विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थानमधील २ तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या कह्यातून २१ लाख ३८ सहस्र रुपयांचे १०६ ग्रॅम मॅफेड्रोनसह दुचाकी असा २२ लाख ५८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रवणसिंग राजपूत आणि आणि महेश बिश्नोई अशी अटक केलेल्यांची नावे असून हे दोघे सध्या खराडी परिसरातील तुळजाभवानीनगरमध्ये रहातात. या दोघा आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थ विक्रीचे प्रकार कायमस्वरूपी बंद होण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करणार आहेत ? |