स्वार्थासाठी तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा वापर करणारा मुसलमान अधिवक्ता अटकेत !

स्वार्थी आणि वासनांध वृत्तीचे मुसलमान !

नवी मुंबई – येथील पोलिसांनी मुंबईतील अधिवक्ता अली काशीफ खान देशमुख यांना अटक केली आहे. स्थानिक दंडाधिकार्‍यांनी त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांनी ऐरोलीत रहाणार्‍या २९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले आणि त्याचे चित्रीकरण केले. हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पीडित तरुणीला नवी मुंबईतील एका मोठ्या राजकीय नेत्याविरोधात बलात्काराची खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. त्या नेत्याकडून पीडित तरुणीच्या नावाने २ कोटी ७० लाख रुपये उकळले. अधिवक्ता अली काशीफ खान देशमुख याने पीडित तरुणीला पेयातून गुंगीचे द्रव्य पाजले आणि तिच्यावर चारचाकीतच बळजोरीने लैंगिक अत्याचार केले.